Share

भाजपच ठरलं ; ‘जन आशिर्वाद यात्रेचे रुपांतर आता जन आंदोलनात होणार’

Published On: 

🕒 1 min read

चिपळूण : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती.

दरम्यान सध्या मिळत असल्याच्या माहितीनुसार रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांनी राणे यांची भेट घेवून त्यांच्या विरोधात कुठे-कुठे याची माहिती काही वेळापूर्वी दिली होती. आणि आता नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्यांना संगमेश्वर पोलीस चौकी मध्ये दाखल करण्यात आले आहे.

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर आता भाजपने आक्रमक पवित्र घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी माध्यमांसमोर येवून आता नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रा आजच्या पुरती थांबलेले आहे. आणि आता या यात्रचे रुपांतर जन आंदोलनात होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर भाजप आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही. असे त्यांनी जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!