Share

पंतप्रधान मोदींनी हेलिकॉप्टरमधून टिपले चेन्नई टेस्टचे दृश्य, शेअर केला फोटो

Published On: 

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. चेन्नईला पोहोचताना पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर एम.ए. चिदंबरम स्टेडियमजवळून उडत असताना त्यांनी हवेतूनच भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे दृश्य टिपले. पीएम मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवर स्टेडियमचे चित्र लगोलग शेअरही केले. या फोटो क्रिकेटपटून पांढऱ्या पोशाखात दिसत आहेत. ट्विट करताना पंतप्रधानांनी लिहिले की, त्यांनी या मजेदार सामन्याचे दृश्य आकाशातून पाहिले.

पंतप्रधान मोदी रविवारी तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी राज्यासाठी अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी मद्रासच्या डिस्कवरी कॅम्पसची पायाभरणी केली. चेन्नईजवळील थियूर येथे हा परिसर तयार केला जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे 2 लाख चौरस मीटर क्षेत्रामध्ये या कॅम्पसच्या बांधकामासाठी 1000 कोटी रुपये खर्च येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईतील मेट्रो रेल फेज -1 विस्ताराचे उद्घाटन केले आणि वॉशरमेनपेट ते विमकोनगरपर्यंत प्रवाशांच्या सेवेस हिरवा झेंडा दाखवला. यासह त्यांनी चेन्नईमध्ये 293.40 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या ‘चेन्नई बीच आणि अट्टीपट्टूदरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले.

दरम्यान, दुसरा कसोटी सामना रंजक स्थितीत पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे, तेथे दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 329 धावा करून टीम इंडियाने सामन्यात आपली पकड मजबूत केली, इंग्लंडचा पहिला डाव 144 धावांत गुंडाळला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!