मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला असल्याचे पाहायला मिळत आहे. “बाळासाहेब ठाकरे हे भोळे होते. भाजपने त्यांना वेळोवेळी कशाप्रकारे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. त्यामुळेच मी भाजपशी धुर्तपणे वागतो”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी, “भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जाते की, आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. माझे वडील भोळे होते, पण मी भोळा नाही. माझ्या वडिलांनीच माझ्या रक्तात हिंदुत्त्व भिनवले आहे. हिंदुत्वाच्या आडून तुम्ही तुमचे डाव साधत होतात. त्याकडे बाळासाहेब ठाकरे यांनी कानाडोळा केला, पण मी तसा कानाडोळा करणार नाही”, असे बोलत जोरदार निशाणा साधला.
मनसेकडून शिवसेनेवर टीका –
राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना शिवसेनेची आक्रमकता म्हणजे केवळ बुडबुडे आहेत, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक होणार का? असा सवाल संदीप देशपांडे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की,‘मुळात आक्रमकता म्हणजे काय? संजय राऊत काही शब्द बोलले म्हणजे त्यांच्यात आक्रमकता आली का? मला असं वाटत की आक्रमकता ही कृतीतून दिसावी लागते. तसेच शिवसेनेची आक्रमकता म्हणजे केवळ बुडबुडे आहेत’, असे देशपांडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

