Share

“भाजप आणि मनसे धर्माचं राजकारण करत आहे”; रोहित पवारांचा अयोध्येतून आरोप

Published On: 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सहकुटुंब अयोध्येत पोहोचले. चार दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेलेल्या आमदार रोहित पवार यांनी आज अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं. यावेळी रोहित पवार यांनी भाजप आणि मनसेवर टीका केली आहे.

“भाजप आणि मनसे धर्माचं राजकारण करत आहेत. मला धार्मिक मुद्द्याचं राजकारण करायला आवडत नाही. व्यक्तिगत विषयाला भाजप आणि आता मनसेसारखे पक्ष राजकारणाची दिशा देतात, मात्र माझ्यासारख्याला ते पटत नाही. माझी कोणासोबत शर्यत नाही. आम्ही आध्यात्मिक ठिकाणांच्या भेटीची सुरुवात पंढरपूरपासून केली. पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्यानंतर राजस्थानमध्ये अजमेरला गेलो, तसंच काशीविश्वेश्वर, मथुरा या ठिकाणी मी भेट दिली असून हा माझा व्यक्तीगत दौरा आहे”, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदाराने विरोध दर्शवला आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “मला राज ठाकरे यांचं २००८ चं परप्रांतीयांबाबत केलेलं भाषण तर आठवत नाही, मात्र त्यांची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी केलेली विविध भाषणं मला नक्कीच आठवत आहेत. या भाषणांनी मी देखील प्रभावित झालो होतो. कारण तेव्हा राज ठाकरे यांच्या भाषणात तरुणांचे, गोर-गरिबांचे विषय होते. राज ठाकरे तेव्हा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांवर बोलत होते,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!