Share

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा बसमधून प्रवास; प्रवाशांशी साधला संवाद, म्हणाले…

Published On: 

चेन्नई :  तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सार्वजनिक बसमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी बसमधील प्रवाशांशी संवाद साधला. तामिळनाडूमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत एमके स्टॅलिन यांच्या द्रविड मुनेत्र कळघम पक्षानं सत्ता मिळवली होती. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त स्टॅलिन यांनी त्यांचे वडील आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी आणि द्रमुकचे संस्थापक सीएन अण्णादुराई यांच्या स्मृतींना मरिना बीचवर अभिवादन केलं.

बसमधून प्रवास करताना “माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता, मी लहानपणी शाळेत बसद्वारे जात असे”, असं ते म्हणाले.तामिळनाडूच्या विधानसभेत बोलताना एमके स्टॅलिन यांनी राज्यासाठी ५ मोठ्या घोषणा केल्या आहेत. तामिळनाडूमधील सरकारी शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या नाश्त्याची योजना स्टॅलिन यांनी जाहीर केली.

ही योजना निवडक महापालिका, शहरी आणि ग्रामीण भागात राबवली जाणार आहे. तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांमधील कुपोषण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, शालेय विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीची घोषणा स्टॅलिन यांनी केली. शहरी भागातील सार्वजनिक आरोग्य सुविधा विकसित करण्याची घोषणा देखील स्टॅलिन यांनी केली आहे.यासाठी स्टॅलिन सरकारकडून मुख्यंमंत्री तुमच्या मतदारसंघात या द्वारे ही योजना राबवण्यात आली आहे. आदर्श शाळांच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या घोषणेसाठी १५० कोटी रुपयांचा निधी स्टॅलिन यांनी जाहीर केला. तर, पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!