🕒 1 min read
परभणी: राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती असताना देखील राजकीय नेते मात्र राजकारण करण्यात व्यस्त असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आरोप -प्रत्यारोपांचे खेळ राज्यातल्या राजकारणात नेहमीच बघायला मिळतात आणि सामान्य माणसाला तेही बघण्यात रस असतो, मात्र आता परिस्थिती वेगळी आहे याचे भान असायला हवे. आता ठाकरे सरकारने परभणीच्या ऑक्सिजन प्लांटचा कच्च्या मालाचा पुरवठा बंद केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
सध्या परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी परभणी खासगी तत्वावर ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र ऑक्सिजन प्लांटला चाकणहून होणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा राज्य सरकारने बंद केला आहे. विभागीय बदल्यांचे कारण या पुरवठा बंदीला देण्यात येत आहे, असा आरोप भाजप करत आहे. तसेच हे ऑक्सिजन प्लांट जिल्ह्यातील एकमेव प्लांट असून याला लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा बंद करणे म्हणजे येथील नागरिकांच्या जीवाशी खेळणे आहे, ठाकरे सरकार बदल्यांचे राजकारण करत असून या राजकारणामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा भीषण तुटवडा होत असल्याचाही आरोप भाजपने केला आहे.
भाजपने अधिकृत अकाऊंट वरून सोशल मिडियावर ठाकरे सरकारवर हा आरोपांचा हल्ला केलं आहे. केवळ राजकीय द्वेषासाठी ठाकरे सरकारचा हजारो नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला आहे, असाही आरोप सोशल मिडिया वरील त्या पोस्ट वरून केला आहे. सध्या परभणीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये खाटांची तसेच वैद्यकीय सुविधांची कमतरता भासत आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजन येथील स्थानिक प्रशासन करत असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन येथील प्रशासन करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादचा रिकव्हरी रेट ‘इतका’! प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा
- ‘ब्रेक दि चेन’मुळे स्कूल बस चालकांवर उपासमारीची वेळ
- ‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’
- देशात ऑक्सिजनचा तुटवडा, टाटा पुन्हा आले धावून; थेट परदेशातून आयात केले २४ ऑक्सिजन कंटेनर
- प्रेम हे लय भारी! पत्नीच्या स्मरणार्थ ८३ वर्षीय तात्यांची शिरजगाव ते पंढरपूर पायी वारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
