औरंगाबाद : मागील आठ दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. पूर्वी, शहरात रोजचे सरासरी आठशे ते हजार बाधित निघत होते. मात्र ११ एप्रिलपासून रूग्णवाढीमध्ये घट होत असल्याचे चित्र आहे. या आठ दिवसांत रोजचे सरासरी सातशे रूग्ण निघाले. दुसरीकडे मृत्युचे प्रमाणही घटले असून रिकव्हरी रेट आठ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे शहरवासीयांसह आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी शहराचा रिकव्हरी रेट ८८.५२३ इतका होता.
औरंगाबाद शहरात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. तत्पूर्वी, जानेवारी २९२१ पासून जिल्ह्यात रोेज आढळणार्या कोरोना रूग्णांची संख्या कमी होऊन २० ते २५ पर्यंत आली होती. १४ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यासह शहराची स्थिती दिलासादायक होती. दरम्यानच्या काळात बाजारपेठांत वाढलेली गर्दी, प्रशासनाने दिलेली ढील, कोरोना चाचणीचे कमी झालेले प्रमाण, एवढेच नव्हे तर नागरिकांनी काळजी घेणेही सोडून दिले होते.
परिणामी, १५ फेब्रुवारीनंतर जिल्ह्यासह शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास सुरूवात झाली. मार्च महिन्यात तर कोरोना संसर्गाने एकदमच उसळी घेतली. त्यातही १० मार्चपर्यंत स्थिती सामान्याच्या काहीसी वरती होती. मात्र त्यानंतर रोजचे हजारपेक्षा अधिक रूग्ण निघू लागल्याने आरोग्य यंत्रणा हादरली.
यात सर्वाधिक संख्या ही शहरातील बाधितांचीच होती. एप्रिल महिन्यातही १० तारखेपर्यंत रूग्णवाढीचे हे प्रमाण कायम होते. दरम्यान, १० एप्रिल रोजी तर जिल्यात तब्बल १९६४ रूग्ण निघून यात शहरातून १०८७ रूग्ण निघाल्याने शहराची आरोग्य यंत्रणा पुन्हा हादरली. मात्र पुढे ११ एप्रिलनंतर शहराच्या वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागून घट पहायला मिळत आहे. मागील आठ दिवसांत शहरात सरासरी प्रतिदिन सातशे रूग्ण निघाल्याचे पालिकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
मागील आठ दिवसांत शहरात कमी आणि ग्रामीण भागात अधिक रूग्ण निघत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, अलीकडे शहरापेक्षा ग्रामीण भागातील मृत्युदर अधिक असल्याचेही अहवालावरून स्पष्ट होते आहे. शहरातील कोरोना रुग्णांचे मृत्युचे प्रमाण कमी होऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले होते. ११ एप्रिलपूर्वी शहराचा रिकव्हरी रेट हा ७९ टक्क्यांपेक्षा कमी होता.
महत्त्वाच्या बातम्या
- देशात ऑक्सिजनचा तुडवडा, टाटा पुन्हा आले धावून; थेट परदेशातून आयात केले २४ ऑक्सिजन कंटेनर
- प्रेम हे लय भारी! पत्नीच्या स्मरणार्थ ८३ वर्षीय तात्यांची शिरजगाव ते पंढरपूर पायी वारी
- जीवावर बेतणाऱ्या ढीसाळ कारभाराचा प्रकाश आंबेडकरांनी केला निषेध
- ‘महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या रेल्वेचा खोळंबा, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
- नाशिकच्या घटनेने मन सुन्न, मी निःशब्द – तुकाराम मुंढे

