मुंबई : गेल्या काही महिन्यापासुन श्रीलंका क्रिकेट हे या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. काही दिवसापुर्वी क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंचा वाद चव्हाट्यावर आला होता. या वादावर तात्पुरता पडदा पडल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिका पराभवानंतर माजी खेळाडूंनी चिंता व्यक्त केली.
आता श्रीलंका क्रिकेट संघ नव्या कारणामुळे पुन्हा एकदा वादात सापडला आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाचे कुशल मेंडिस, निपोशेन डिकवेला आणि धनुष्का गुणतिलका यांना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने निलंबीत केले आहे. कारण इंग्लंड दौऱ्यादरम्यान सिगारेट पिण्यासाठी या तिन्ही खेळाडूंनी बायो बबलच्या नियमाचा भंग केला आहे. हे तिन्ही खेळाडू इंग्लंडच्या रस्त्यावर सिगारेट पिताना दिसले आहे.
Familiar faces in Durham tonight, enjoying their tour! Obviously not here to play cricket, this video was taken at 23.28 Sunday. Disappointing performance by these cricket players but not forgetting to enjoy their night at Durham. RIP #SrilankaCricket #KusalMendis #ENGvSL pic.twitter.com/eR15CWHMQx
— Nazeer Nisthar (@NazeerNisthar) June 28, 2021
या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ श्रीलंकेच्या एका चाहत्याने शेअर केला होता. या प्रकरणावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डिसिल्व्हा म्हणाले, ‘कुशल मेंडिस, निपोशेन डिकवेला आणि धनुष्का गुणतिलका यांनी बायो बबलच्या नियमाचा भंग केल्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. तसेच त्यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहे.’ मागील काही महिन्यात श्रीलंका क्रिकेट संघाने सलग पाच टी-20 मालिका गमावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चिलापी मासे मीच उजनी धरणाच्या जलाशयात सोडले!’; पवारांनी सांगितली आठवण
- ‘गर्व आहे मला भक्त असल्याचा’ अमृता फडणवीस याचं ट्विट
- ममता बॅनर्जी बंगालच्या राज्यपालांच्या मागे हात धुवून का लागल्या आहेत ?
- अभिनेत्री विशाखा सुभेदारचा राज्यपलांच्या हस्ते सन्मान
- राज ठाकरेंचा लाडका श्वान ‘जेम्स’चे निधन


