🕒 1 min read
मुंबई : थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी अशी मागणी सर्वसामन्यांकडून केली जात आहे. तरी देखील महावितरण विभाग तोट्यामध्ये असल्याचे सांगून अनेकांची वीज सरकारकडून तोडण्यात येत आहे.
परंतु दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करून सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचे आरोप भाजपने केले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं सरकारी निवासस्थान आणि कार्यालयाच्या पुनर्बांधणीवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. अतिशय एशो-आरामाचा माहोल त्या ठिकाणी बंगल्यामध्ये करण्याचे काम सरकारकडून करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
या बंगल्याचे व त्यामध्ये चालू पुनर्बांधणीचे असलेले फोटो आणि व्हिडिओ भाजपनं प्रसिद्ध केले आहेत. सरकारकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च करण्यासाठी पैसे आहेत. मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत? असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी उपस्थित केला आहे.
सरकारकडे पैसे नाही म्हणतात, गरीब शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कापतात, कोरोना योध्यांना पगार देत नाही मात्र ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC यांचे सरकारी ऑफिस व बंगल्यावर जाऊन पहा कसे पैसे उधळतात!@OfficeofUT #NitinRaut #MahaVikasAghadi @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/UCNhzSpXnd
— Vishwas Pathak (@vishwasvpathak) March 18, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जामंत्र्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावर अद्याप तरी महाविकास आघाडी सरकारकडून प्रतिक्रिया आलेली नाही.मात्र, येणाऱ्या काळात या खर्चावरुन नवीन वाद पेटण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकारकडे ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी पैसे आहेत मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत?
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
- शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
