Share

…म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (दि. १८ मार्च) रोजी जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली आहे. एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे आहेत. मात्र, जळगाव महापालिकेवर शिवसेनेनं झेंडा फडकावला असून गेल्या आठवड्याभरात मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं.

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मत पडली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मतं पडली आहेत. बहुमतासाठी ३८ मतांची गरज शिवसेनेला होती. त्यामुळे अवघे १५ नगरसेवक असूनही तिप्पट बलाढ्य भाजपला शिवसेनेनं आपल्या बाणाने घायाळ केलं आहे.

महापालिकेतील विजयानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. तर, शिवसेना नेत्या व अभिनेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील ट्विटद्वारे शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. ‘जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या सौ. जयश्रीताई महाजन जी तसेच उपमहापौरपदी निवड झालेले श्री. कुलभूषण पाटील जी यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं, हेच ट्विट रिट्विट करून उर्मिला मातोंडकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

संकटमोचक गिरीश महाजन यांना मोठा धक्का !

भाजपच्या २७ हुन अधिक नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिला आहे. दरम्यान, भाजपचे हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. जळगावातील या पराभवामुळे भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाराजन यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर, एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यापासून खान्देशात भाजपला उतरती कळा लागली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!