🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या वाढीव वीजबिल आणि त्यानंतर वसुली करण्याकरिता ग्राहकांची वीज कनेक्शन तोडली जात असल्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी अशी मागणी होत आहे.
वीज कनेक्शन तोडण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनातील निर्णय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी फिरवल्याने ते सध्या टीकेचे धनी बनले आहेत.यातच आता नितीन राऊत यांचं मंत्रीपद धोक्यात आलं असल्याची चर्चा असताना आता राऊत यांच्या सरकारी बंगल्याच्या डागडुजीसाठी महाराष्ट्र सरकारने पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
सरकारकडे पैसे नाही म्हणतात, गरीब शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कापतात, कोरोना योध्यांना पगार देत नाही मात्र ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC यांचे सरकारी ऑफिस व बंगल्यावर जाऊन पहा कसे पैसे उधळतात!@OfficeofUT #NitinRaut #MahaVikasAghadi @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/UCNhzSpXnd
— Vishwas Pathak (@vishwasvpathak) March 18, 2021
भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी काही फोटोही पोस्ट केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी म्हटलंय, की ‘सरकार पैसे नाही म्हणतं, शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापतं, कोरोना योद्ध्यांना पगार देत नाही. मात्र उर्जामंत्री नितीन राऊत यांचं सरकारी कार्यालय आणि बंगल्यावर जाऊन पाहा, कसे पैसे उधळतायत’ असं म्हटले आहे.
पैसे थकीत राहिल्याने शेतकऱ्यांची वीज तोडता मग बंगल्यावर खर्च कशासाठी केला जातोय असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.सरकारकडे रिनोव्हेशनच्या खर्चासाठी पैसे आहेत. मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत? असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
- शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
