नांदेड : महावितरण सध्या गावा गावात ज्या बळीराजाची वीज जोडणी कपात आहे, तोच बळीराजा आज वीजबिलांच्या थकबाकीमुळे संकटात सापडलेल्या महावितरणच्या मदतीला धावला आहे. कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीत सवलत देणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास नांदेड परिमंडळात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देगलूर विभागातील १४७ कृषिपंप ग्राहकांनी २३ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा करुन २२ लाख रूपयांची सवलत मिळवली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे स्वप्नपुर्ती करणारे हे अभियान असून थकबाकीदार शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेत थकबाकीमुक्त व्हावे. नवीन वीज जोडणीसाठीही कृषी ऊर्जा अभियानामध्ये तरतूद असून एकूणच शेतकरी हिताचे हे अभियान असल्याचे सांगितल्या जात आहे.
या अभियानात कृषिपंपधारकांकडून वसूल होणाऱ्या वीजबिलाच्या एकूण रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात तर ३३ टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरण तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. महावितरणही कृषीपंपधारकांना सुरळीत व दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईची बातच न्यारी; फक्त चार चेंडुत मिळवला विजय
- ‘त्याची आवडती पोझ आणि माझे आवडते एक्सप्रेशन’
- महाजनांना धक्का : भाजपचे तब्बल 27 फुटल्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला
- ‘मातोश्रीपर्यंत जातात असे बडे नेते अडकणार म्हणून सचिन वाझेंच्या जीविताला धोका’
- भारताचा गोलंदाजपटू राहुल शर्माच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
