Share

शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : आज (दि. १८ मार्च) रोजी जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली आहे. एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे आहेत. मात्र, जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकावला असून गेल्या आठवड्याभरात मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं.

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मत पडली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मतं पडली आहेत. बहुमतासाठी ३८ मतांची गरज शिवसेनेला होती. त्यामुळे अवघे १५ नगरसेवक असूनही तिप्पट बलाढ्य भाजपला शिवसेनेनं आपल्या बाणाने घायाळ केलं आहे.

दरम्यान, भाजपच्या २७ हुन अधिक नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिला आहे. दरम्यान, भाजपचे हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. जळगावातील या पराभवामुळे भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाराजन यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर, एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यापासून खान्देशात भाजपला उतरती कळा लागली आहे. तर, महापालिकेतील विजयानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!