Share

Crime News | मुंबईत 5 कोटी रुपयांच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक, 2 कोटी रुपयांचे सोनेही जप्त

Published On: 

मुंबई : कस्टम अधिकाऱ्यांनी एका विदेशी महिलेला पाच कोटींच्या ड्रग्जसह अटक केली आहे. या 50 वर्षीय परदेशी महिलेकडून 500 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. आरोपी महिलेला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर डीआरआयच्या मुंबई पथकाने पाच आरोपींना सोन्याची तस्करी करताना पकडले आहे. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईची माहिती कस्टम विभागाने दिली आहे.

इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून ही महिला मुंबईत पोहोचली –

कस्टम्स एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) च्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अरायव्हल गेट हॉलजवळ आरोपी महिला बिंटू जानेहला थांबवून तिची चौकशी केली. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून ही महिला मुंबईत पोहोचली होती. आरोपी महिलेने तिच्या बॅगेत कोकेन लपवले होते.संबंधित महिला हे कोकेन मुंबईतील एका व्यक्तीला देणार होती.

नेटवर्कशी जोडलेल्या इतर लोकांची ओळख शोधण्याचा प्रयत्न सुरु –

चौकशीदरम्यान बिंटू जानेहने सांगितले की ती एका गरीब कुटुंबातील आहे. माल पोहोचवण्याच्या बदल्यात मुंबईतील एका व्यक्तीला कमिशन देण्याचे अज्ञात व्यक्तीने सांगितले. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे हे पाकीट त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र आरोपी महिलेने हे पाकीट कोणाला डिलिव्हरी करणार होते याबद्दल काहीही माहिती असण्यास नकार दिला. संबंधित महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे कस्टम अधिकारी या नेटवर्कशी जोडलेल्या इतर लोकांची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

 2 कोटी रुपये किमतीचे 4.5 किलो सोने जप्त-

याशिवाय बुधवारी सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 2 कोटी रुपये किमतीचे 4.5 किलो सोने जप्त केले. कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट रोजी तीन वेगवेगळ्या प्रकरणांपैकी एका प्रकरणात तीन प्रवाशांना कालिकत-मुंबई फ्लाइटच्या टॉयलेट आणि सीटमध्ये लपवून सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आली होती. हे तिन्ही प्रवासी शारजाहून मुंबईत आले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!