🕒 1 min read
पुणे : ज्या दिवसापासून शिंंदे सरकार स्थापन झालं आहे. त्या दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय निवडणूक समितीमध्ये निवड झाली आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत का?, असा सवाल अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री म्हणून देखील बघायला आवडेल, असं त्या म्हणाल्या. अमृता फडणवीस पुण्यातील एक कार्यक्रमाला उपस्थित होत्या, त्यावेळी त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले होते.
देवेंद्र फडणवीसा यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि बालेकिल्ला नागपूर –
देवेंद्र फडणवीसा यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि बालेकिल्ला नागपूर आहे. ते नागपूरचे पालकमंत्री जरी असले, तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत असल्याचंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं. तसेच मला महाराष्ट्र खूप आवडतो. मला महाराष्ट्र राज्यातच राहायचं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनाही मला महाराष्ट्रातच बघायला आवडेल, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
गोविंदांना 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयाला अमृता फडणवीसांचा पाठिंबा-
दरम्यान, शिंदे सरकारने गोविंदांना 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयाला अमृता फडणवीसांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर दहिहंडी ही आपली परंपरा आहे. या उत्सवाला वाव मिळायला हवा, असंही त्यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :
- VIDEO | “SEX साठी पुरूषाची गरज नाही” ; Selfmarriage केल्यानंतर ट्रोल झालेल्या अभिनेत्रीचे उत्तर! म्हणाली, मी दारू आणि गांजा…
- ’50 खोक्यांचा नारा चांगलाच झोंबलेला दिसतोय…’; अमोल मिटकरी यांचे सत्ताधाऱ्यांना चिमटे
- Congress । सरकार बेरोजगारांची थट्टा करतय; गोविंदाच्या आरक्षणावरून काँग्रेस आक्रमक
- Cricket News | “रात्री 10 पेग प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठोकले शतक” ; माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
- Gulabrao Patil । एकनाथ शिंदेंनी पन्नास थरांची दहीहंडी फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतरण झाले – गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
