पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर होत आहेत.या एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे बिहारच्या जनतेने सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक भाजपच्या नेतृत्वातील एनडीएसाठी प्रतिष्ठेची बनली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिहारमध्ये तब्बल १२ प्रचारसभा घेतल्या. परंतु बिहारी मतदार यावेळी मोदींच्या कोणत्याही आश्वासने आणि घोषणांना भुलले नसल्याचेच एक्झिट पोलच्या निष्कर्षांवरून स्पष्ट होत आहे.
२४३ जागांची ही विधानसभा आहे. यामधील १२२ जागा मिळाल्या तर बहुमत मिळेल आणि हे बहुमत मिळवणे तेजस्वी यादव यांच्या पक्षाला शक्य आहे अशी शक्यता आहे. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला १२० च्या वर जागा दाखवल्या आहेत.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांच्या उद्यापासून होणाऱ्या मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अत्यंत व्यापक अशी ही व्यवस्था असून मतमोजणीसाठी राज्यातील 38 जिल्ह्यात 55 मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत.
मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर निम लष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान घेण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्राह्मण महासंघाच्या आक्रमक पवित्र्यानंतर खडसेंवर आली दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ’
- राज्यपालांनी अर्णबची चिंता करू नये, त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे – भुजबळ
- ‘उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे’
- न्हावरेतील घटनेचा तपास गांभीर्याने करण्याची आढळराव पाटील यांची मागणी
- ‘प्रभू श्रीरामांनी रावणाचा जसा पराभव केला, तसाच करोनाचाही पराभव होणार’ – बोरिस जॉन्सन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
