लंडन: दीपावली या मोठ्या सणावर यावर्षी कोरोनाच सावट आहे. त्यामुळे भारतातील सर्वात मोठा सण दीपावली त्याच बरोबर जगभरात देखील दीपावलीचा उत्साह दिसून येत असतो. यामध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हिंदू समुदायाला दिपावली निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. करोनाच्या पहिल्या साथीवर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरलेल्या युरोपीयन देशांना करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउन सुरू असतानाही करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवसात ६० हजार बाधित आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जर्मनीमध्ये करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी एक महिन्यासाठी अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हिंदू समुदायाला दिपावली निमित्ताने शुभेच्छा दिल्या, त्यावेळी ते बोलत होते. बोरिस जॉन्सन यांनी ‘आय ग्लोबल दीपावली महोत्सव २०२०’चे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले. एकजुटता आणि दृढ इच्छाशक्तिच्या आधारे करोनाच्या संसर्गावर आपण नक्कीच मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिपावलीचा सण हा अंधारावर प्रकाशाने विजय मिळवण्याची शिकवण देतो. अज्ञानावर ज्ञानाने मात केली जाते. तसेच आपण करोनावर विजय मिळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभू श्रीरामांनी आणि सीतेने रावणाचा जसा पराभव केला, त्याच प्रकारे ब्रिटनही करोनाला मात देणार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. आगामी दिवसांमध्ये करोनाचे मोठे आव्हान उभे असणार आहे. संपूर्ण ब्रिटनमधील लोक एकत्रित येणार असल्याचे करोनाचा पराभव करणार असल्याचा विश्वास जॉन्सन यांनी व्यक्त केला.आपल्या शासकीय निवासस्थानावरून संबोधित करताना पंतप्रधान बोरिस म्हणाले, रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम आणि त्यांची पत्नी सीता ज्या प्रकारे आपल्या घरी परतल्या आणि त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावण्यात आले होते. अगदी त्याच प्रकारे आपणही संकटातून मार्ग काढू शकतो आणि जिंकू शकतो. ब्रिटनमध्ये दिपावलीचा उत्सव लॉकडाउनमध्ये साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जॉन्सन यांनी भारतीय समुदायाचेही कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांनी अर्णबची चिंता करू नये, त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे – भुजबळ
- दोन दिवसांपूर्वीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टारला कोरोनाची लागण…
- ‘ब्राह्मण महासंघाच्या आक्रमक पवित्र्यानंतर खडसेंवर आली दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ’
- धाडीचे सत्र सुरूच, बॉलीवूड स्टार्सवर एनसीबी कडून सलग छापे
- ‘तब्बल १००० युवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवण्याचा युवक काँग्रेसचा संकल्प’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
