Share

‘उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे’

Published On: 

मुंबई- राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं आहे असं म्हणत विरोधकांना टोला लगावला.

आपण सगळे करोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी होय मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली आहे, इथे अंमली पदार्थांची शेती होते आहे असं चित्र निर्माण केलं. मात्र त्यांचं हे कारस्थान आपण उधळून लावलं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता भाजपने देखील मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा कट उधळला, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पुढे बोलताना भातखळकर यांनी ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. कायद्याचा गैरवापर करून लोकांना अटक करणे, त्यांना मारहाण करणे, हे प्रकार होत आहेत ते न कळण्याइतकी जनता दुधखुळी नाही, असेही भातखळकर यांनी समाज माध्यमांवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!