मुंबई :टीव्हीवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडता रिअलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’.. हिंदी बिग बॉस हिट झाल्यानंतर मराठीतून बिग बॉसला सुरुवात झाली. बिग बॉस सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशी सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र यावर आता ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/CQXuwLwhyAI/?utm_source=ig_web_copy_link
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत बिग बॉस मराठी ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. ‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठीवर’, असे कॅप्शन दिले आहे.
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील ‘बिग बॉस मराठी ३’ संदर्भात एक ट्वीट करत लिहिले की, ‘त्याच्यासोबत मी परत येतो, तुम्ही तयार रहा’ असे म्हटले आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३’चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा… #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर.@ColorsMarathi @EndemolShineIND pic.twitter.com/m1EdFX0tBN
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) June 21, 2021
तसेच आता यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, घरात कोणते टास्क रंगणार आणि यंदाच्या पर्वात नेमकं काय होणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. मात्र आता हळू हळू याची माहिती प्रेक्षकांन समोर येणार आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी ३’ पाहण्यासाठी चाहते चांगलेच आतुर झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय’
- ‘तू फिरकी गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न कर, आणि ‘हे’ ट्विट फ्रेम करून लाव’ ; वॉर्नच्या ट्विटवर सेहवागची प्रतिक्रिया
- खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरवात
- मुलासाठी घेतल्याच्या ३ कोटीच्या कारबाबत सोनू सुदने केला खुलासा
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

