Share

बातम्यांमध्ये झळकण्यासाठी साहेबांवर टीका केली जाते : अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिलांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत. सरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करु असं म्हटले. मात्र, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली. सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय होता. यामुळे राज ठाकरेंवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. “वीज बिलाच्या मुद्द्यावर अदानी यांना भेटल्यानंतर त्यांनी वीज बिलावरुन यू टर्न घेतला, या गोष्टीत नाकाएवढंही तथ्य नाही. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावं घेतात, की त्यातून बातम्या होतात” अशी टीका राज ठाकरेंचं नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

अमरावतीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “वास्तविक पाहता पवार साहेबांचा या राज्याशी ६० वर्षांपासून संबंध आहे. त्यामुळे पवार साहेब असं कधीच करू शकत नाहीत. केवळ बातम्या होण्यासाठी काही जण शरद पवारांवर टीका करतात” असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!