मुंबई : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मोदी सरकारची तुलना ही ब्रिटिश सरकारशी केली आहे. या काळात देखील जनतेवर कायदे लादले जात होते, मात्र आंदोलनाने ब्रिटिशांना देखील माघार घ्यावी लागत होती. आता देखील याचीच पुनरावृत्ती होतीये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
‘मला इतिहास आठवतो. 1908 दरम्यान रॉलेट ऍक्ट नावाचा कायदा होता. हा कायदा लॉर्ड चेम्सफर्डने आणला होता. त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला. यामुळे जालियानवाला बाग येथे आंदोलन झालं. जनरल डायरने गोळीबार केला. आंदोलन चिघळलं. इंग्रज सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला. या इतिहासाची पुनरावृत्ती होतेय,’ असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचे देखील त्यांनी खंडन केलं आहे. ‘शरद पवारांनी यू टर्न घेतला हा अनुमान कसा काढता? त्यांनी काय नाव घेतलं, भाजपचे काही खासदारही कायद्याला विरोध करत आहेत. अद्याप कुणी यू टर्न घेतला नाहीये. मोदींचा स्वतःच्या अस्तिवासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.’ अशी टीका आव्हाडांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांवरील आरोप हा मोदींनी स्वतःच्या अस्तिवासाठी केलेला प्रयत्न’
- ‘गेली तीन दशके पवार साहेब चार खासदारांच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहे’
- माता रमाई आंबेडकरांचे मुंबईत स्मारक उभारणार – रामदास आठवले
- ‘राणेंना शिवसेना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही’
- गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्रिपदी पाहायचे स्वप्न अधुरेच, धनंजय मुंडे भावुक


