Share

‘पवारांवरील आरोप हा मोदींनी स्वतःच्या अस्तिवासाठी केलेला प्रयत्न’

Published On: 

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यामधली कोंडी अद्याप कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना कृषी कायद्यां विरोधातील आंदोलनावर मौन सोडलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर देखील भाष्य केले आहे. मी सुधारणेसाठी तयार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. शरद पवार यांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला विरोध केला नाही असं मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आपली भूमिका बदलून युटर्न घेतल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला आहे. ‘शरद पवारांनी यू टर्न घेतला हा अनुमान कसा काढता? त्यांनी काय नाव घेतलं, भाजपचे काही खासदारही कायद्याला विरोध करत आहेत. अद्याप कुणी यू टर्न घेतला नाहीये. मोदींचा स्वतःच्या अस्तिवासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. कायदा येणार होता, छापलं होतं, असं काही नाही. लोक या कायद्याला काळा कायदा म्हणतायत,’ असं भाष्य आव्हाड यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!