🕒 1 min read
मुंबई : एक काळ होता जेव्हा विराट कोहलीचे नाव ऐकले तर सगळ्यांना एक तरुण आक्रमक खेळाडू आठवायचा. जो सतत भांडायला तयार असे. मात्र आता त्याचे वय आणि अनुभव वाढल्यानंतर विराटमध्ये मोठा बदल आलाय. हे सगळे मत केवळ क्रिकेट रसिकांचे नव्हे तर विराटचा आरसीबीतील सहकारी मॅक्सवेल याचेही आहे. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत सांगितले आहे.
ग्लेन मॅक्सवेलने (glenn maxwell) विराट (virat kohli) बाबत बोलताना सांगितले, “त्याला आता निवांत खेळताना बघणं कोणत्याही बाहेरील दबावाशिवाय आश्चर्यकारक आहे. मला वाटतं, पूर्वीच्या दिवसांत त्याच्याविरुद्ध खेळताना तो एक आक्रमक प्रतिस्पर्धी होता, जो तुम्हाला टक्कर द्यायचा. तो नेहमी खेळावर स्वतःचा दबदबा मिळवायचा आणि स्वतःला विरोधी पक्षावर लादण्याचा प्रयत्न असे.”
मॅक्सवेलने विराट त्याचा जवळचा मित्र बनला आहे याचे त्याला आश्चर्य वाटते असेही सांगितले. “मला या वर्षी त्याच्याविषयी काहीतरी अधिक लक्षात आले ते म्हणजे तो खरोखर त्याच्या भावनांना आता ताब्यात ठेवतो. तो खरोखर त्याच्या निर्णयक्षमतेला मोजून ठेवतो. त्याने मला नक्कीच आश्चर्यचकित केले आहे आणि कदाचित आम्ही दोघेही एकमेकांच्या किती जवळ आलो आहोत याचे उदाहरण म्हणजे आता आम्ही क्रिकेट विषयी शांततेत बोलतो,” मॅक्सवेल म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- कराची कसोटी अनिर्णित झाल्यानंतर शोएब अख्तर PCB वर संतापला, म्हणाला- ‘पीच पाहून झोप येते’
- भारताबाहेरही उत्साहाने साजरी केली जाते होळी! जाणून घ्या कोणते आहेत देश…
- “साहेब काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे…”; भाजपचे शरद पवारांना खोचक प्रत्युत्तर
- आमिर खान अनुष्का शर्माची जोडी पुन्हा दिसणार एकत्र? जाणून घ्या…
- पंजाबमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भगवंत मान यांचा मोठा निर्णय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
