मुंबई: राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे याचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र एकीकडे अशी परिस्थिती असताना अशातच आता राज्याला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या जेबीएल कंपनी राज्यात तब्बल दोन हजार कोटींची गुंतवणूक करुन पुण्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये प्रकल्प उभा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जेबीएल ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रात नावाजलेली आहे. महाराष्ट्रात स्मार्टफोन, मोबाइलचे सुटे भाग, गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अन्न व खाद्यपदार्थाची वेष्टने आदी क्षेत्रात जेबीएल कंपनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे.
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये ‘जेबीएल’ आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार असून मोबाइलचे सुटे भाग आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन तेथे होईल. या प्रकल्पामुळे १३ हजार जणांना रोजगार मिळण्याचा शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा राज्यातील बेरोजगारांना होऊ शकतो.
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जेबीएल कंपनीचे भारतातील प्रमुख डॅन वँग, डेसमाँड चेंग, सुधीर बालकृष्णन, व्हिक्टर मोनोरॉय, सुधीर साहू, पॅक्ट्रीक कॉनली यांच्यासह उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसी सीईओ डॉ. पी. अन्बलगन या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच जेबीएलला त्यांना हवे त्या ठिकाणी जमीन देण्याची महाराष्ट्राची तयारी असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
