🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती.
दरम्यान सध्या मिळत असल्याच्या माहितीनुसार रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांनी राणे यांची भेट घेवून त्यांच्या विरोधात कुठे-कुठे याची माहिती काही वेळापूर्वी दिली होती. आणि आता नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. सध्या विविध माध्यमातून मिळत असल्याच्या माहितीनुसार त्यांना नाशिक येथे घेवून जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानेच रत्नागिरी पोलिसांकडून ही प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी राणेंनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. पण हायकोर्टानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यासाठी नकार दिला आहे. नाशिकमधून दाखल झालेला पोलिसांच्या पथकाकडून ही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळेच रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई करत नारायण राणेंना अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आमच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्याविरुद्ध तुम्ही काय काय केलंत ? फडणविसांनी साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा
- “हिंदुत्वाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपद मिळवलं”; नारायण राणे पुन्हा बरसले
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘…अन्यथा पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करायला बसू’ ; फडणवीसांचा इशारा


