Share

मोठी बातमी: एनआयए कोठडीत असलेल्या सचिन वाझेंना जे.जे. रुग्णालयात हलवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यांनतर शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.

एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला आहे. ‘एनआय’च्या वकिलांनी सचिन वाझे यांची १० दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी शनिवारी NIA ने सचिन वाझे यांनी तब्बल १३ तास चौकशी केली होती.

दरम्यान, शनिवारी देखील वाझे यांना चौकशीमुळे थकवा जाणवत होता. यामुळे त्यांच्यावर जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. तर रविवारी पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले होते. या डॉक्टरांनी वाझे यांची तपासणी करून रात्री १ च्या सुमारास एनआयए कार्यालयाबाहेर गेल्याचे सुत्रांनी सांगितले.

त्यानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोठडीत असलेले API सचिन वाझे (Sachin Vaze) यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना आता उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. एनआयएच्या कार्यालयात उपचार करणे शक्य नसल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!