नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना काल दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अस्वस्थ वाटू लागल्याने व प्रकृती खालवल्याने त्यांना काल सकाळी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
छातीत दुखत असल्याने, तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज दुपारी त्यांना लष्करी रुग्णालयातून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्समध्ये त्यांची तपासणी करण्यात आली असता डॉक्टरांनी त्यांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे.
येत्या ३० मार्च रोजी सकाळी त्यांची बायपास सर्जरी होण्याची शक्यता आहे. तथापि, राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असल्याचं माहिती सध्या मिळत आहे. छातीत दुखू लागल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना काल शुक्रवारी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज त्यांना पुढील आरोग्य तपासणीसाठी एम्समध्ये भरती करण्यात येत असल्याचं लष्करी रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. त्यानुसार दुपारी कोविंद यांना एम्समध्ये भरती करण्यात आलं.
यापूर्वी लष्करी रुग्णालयाने या आधी राष्ट्रपतींचं हे रुटीन चेकअप असल्याचं म्हटलं होतं. त्याबाबतचं रुग्णालय प्रशासनाने बुलेटिनही काढलं होतं. त्यात राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, बांगलादेशाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. त्यांनी राष्ट्रपतींच्या चिरंजीवांशी चर्चा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकले, दररोज ७५०० कोटीचं नुकसान
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
