Share

सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकले, दररोज ७५०० कोटीचं नुकसान

Published On: 

🕒 1 min read

कैरो : इजिप्तमधील सुएझ कालव्यात एक महाकाय जहाज अडकल्याने युरोप आणि आशियातील व्यापार ठप्प झालाय. या मार्गावरील समुद्री वाहतूक करणारे शेकडो जहाजांची रांगच लागलीय. यामुळे दररोज ७५०० कोटी रुपयांच्या व्यापाराचं नुकसान होतंय. याचा थेट परिणाम भारतावरही होण्यास सुरुवात झालीय.

त्यामुळेच भारतानेही यावर ४ सुत्री उपाययोजना केली आहे. व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने आपल्या अधिकृत वक्तव्यांत म्हटलं, “सुएझ कालव्यातील अडथळ्यांमुळे जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम होत आहे.” या बैठकीचं नेतृत्व विशेष सचिव पवन अग्रवाल यांनी केलं. त्यांच्यासोबत बैठकीत पोर्ट , शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय, ADG शिपिंग, कंटेनर शिपिंग लायसन्स असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनही सहभागी होती.

सुएझ कालवा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडतो. हा कालवा १९३.३ किलोमीटर लांबीचा आहे. त्याचे बांधकाम १८६९ मध्ये झाले. सुएझ कालव्याचं एक टोक उत्तरेला बुर सैद शहराजवळ आहे, तर दक्षिणेकडील टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ आहे.

सुएझ कालव्यामुळे युरोप आणि आशिया या दोन खंडांमधील सागरी वाहतूक कमी वेळेत वेगाने करणं शक्य झालं. सुएझ कालवा सुरु होण्याआधी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला जवळपास ७००० किलोमीटर लांब वळसा घालून जावं लागायचं. मात्र, हा कालवा झाल्याने हे ७००० किमी अंतर कमी होऊन १९३.३ किमी झालं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!