मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे मोठे नेते आहे, पण अजिंक्य नाही. हे आज बंगालच्या जनतेनं दाखवून दिले,’ अशी टीका शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केली. ‘बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला फक्त बहुमत मिळाले नाही, तर प्रचंड बहुमत मिळालं आहे. ममता बॅनर्जी यांना १२५ जागा सुद्धा मिळणार नाही, निकालानंतर ममता घरी जातील असं वातावरण निर्माण करण्यात आले. पण ममतांनी आपण कोण आहोत, हे दाखवून दिलं आहे. जिद्द काय असते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे’ या शब्दांत राऊत यांनी कौतुक केले.
यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘तुमच्या घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगालमध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या, तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग?’ असा सवाल निलेश राणेंनी केलाय.
त्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 2, 2021
संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. निवडणूक लढविण्यास ते भीतात असे आरोप राऊत यांच्यावर अनेकदा झालेत. यावेळेसही निलेश राणेंनी तोच मुद्दा उचलत राऊतांवर निशाणा साधलाय. दरम्यान, पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तिथे भाजपच्या समाधान आवताडेंचा विजय झालाय.
महत्त्वाच्या बातम्या
- बंगालचे निकाल समोर येताच अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- ‘जखमी वाघिणीचा ऐतिहासिक विजय!’, संजय राऊतांची बंगाल निकालावर प्रतिक्रिया
- ‘लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली’, बंगाल निकालावर गुलाबराव पाटलांची टीका
- ‘मोदी-शाह हे मोठे नेते, पण अजिंक्य नाहीत’, भाजपच्या पराभवावर राऊतांचा टोला
- ‘संपूर्ण ताकद पणाला लावली पण पदरी निराशाच आली’, खडसेंचा भाजपला टोला


