मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मोठ्या संख्येने राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईमध्ये आले होते. यावेळी कोरोना नियम देखील सर्वांकडून पायदळी तुडवण्यात आले असल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच पोलिस आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांनी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे तसेच गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे देखील सांगितले जात आहे.
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्यांनी भाजपला सूचक इशारा दिल्याचे दिसले. ‘ कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, असं सांगतानाच शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी ही जागा पुरणार नाही,’ असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला संपवण्याचा प्रयत्न झाला असला तरीही मी संपले नाही’- पंकजा मुंडे
- हाताच्या पंजाने ‘वाघ’ पुन्हा गारद; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- पुढे मार्ग खडतर दिसतो पण आपण संघर्ष करत राहू – पंकजा मुंडे
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

