मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्यांनी भाजपला सूचक इशारा दिल्याचे दिसले. ‘ कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, असं सांगतानाच शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी ही जागा पुरणार नाही,’ असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘आपण आपलं घर कशाला सोडायचं, ज्यावेळी छत अंगावर पडेल त्यावेळी पाहू. माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाहा. आपण कशाला घाबरायचं? असं म्हणत पंकजा मुंडेंनी राज्य नेतृत्वाला सुनावलं आहे. तसेच ‘मला संपवण्याचा प्रयत्न झाला असला तरीही मी संपले नाही. माझ्या प्रवासाला एक स्वल्पविराम द्यावा, बाकीचं केंद्रीय नेतृत्वावर सोडा. त्यांचं काहीतरी वेगळं नियोजन असेल. मला ज्यादिवशी वाटेल की इथे राम नाही, त्यावेळी बघू. मला माझं घर सोडायचं नाही.’ असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडेंचा इशारा ; ‘दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही’
- पुढे मार्ग खडतर दिसतो पण आपण संघर्ष करत राहू – पंकजा मुंडे
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

