ठाणे : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून काही ना काही मुद्द्यांवरून आघाडीत बेबनाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. तर, गेली दीड वर्षे हे सरकार स्थिरपणे चाललं असून पुढील पाच वर्षे देखील पूर्ण करेल असं नेते सांगत आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसने अधिक आक्रमक रूप धारण करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्या हाती सोपवली.
महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे नाना पटोले यांच्याकडे गेल्यापासून त्यांनी देखील अधिक आक्रमक रूप घेतले आहे. महाविकास आघडीतील पक्ष सत्तेसाठी एकत्र असले तरी नेत्यांसह कार्यकर्त्यांची फोडाफोडी ही सुरूच आहे. यावरून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असली तरी हे प्रकार अजून सुरूच आहेत.
एकाबाजूने महाविकास आघडीतील समन्वय आणि पक्ष प्रवाशांचा गोंधळ हाताळण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असून काँग्रेसने शिवसेनेला दोन मोठे धक्के दिले आहेत. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना बाळ्या मामा म्हणून ओळखले जाते. ते ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आहेत. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना असा प्रवास करून आता ते काँग्रेसच्या वाटेवर निघाले आहेत.
म्हात्रेंच्या जाण्यासोबतच शिवसेनेला विदर्भात देखील धक्का बसणार आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांशी वाद असल्याने त्यांनी काँग्रेसची वाट धरल्याचे बोलले जात आहे. इतकंच नाही तर त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे देखील याबाबत दाद मागितली होती. मात्र, त्यांना दाद न दिल्याने अखेर त्यांनी काँग्रेसची वाट धरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पहिल्यांदाच खलनायक साकारणाऱ्या अतुल परचुरेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती
- पुढे मार्ग खडतर दिसतो पण आपण संघर्ष करत राहू – पंकजा मुंडे
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर


