मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना ‘आपली शक्ती कमी करण्याचा डाव पूर्ण होऊ द्यायचा नाही. मला पुढे खडतर मार्ग दिसतो. पण आपण संघर्ष करत राहू, असं सांगतानाच योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत. सात्विक आहोत,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- माझ्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही घेवून जा, तुमचे दु:ख माझ्या पदरात टाका; मुंडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
- Breaking :’तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू’; कार्यकर्त्याचे राजीनामे पंकजा मुंडेंनी केले नामंजूर
- एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देणारे शासन निर्णय जारी
- ‘आमचा मानव फक्त सुशांत’ ; पवित्र रिश्ता भाग दोनवर सुशांतचे चाहते नाराज
- इंग्लंडच्या खेळाडूंवर होणाऱ्या वर्णभेदी टीकेवर पंतप्रधानांनी सोडलं मौन, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

