🕒 1 min read
नागपूर : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ७२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या हिट लिस्टवर आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावना गवळींना ईडीकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे, असा आरोप करत त्यांचे समर्थन केले होते. यानंतर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला असतानाच आता शिवसेनेतील नेत्यानेच भावना गवळी यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.
शरद पवार यांची खासदार भावना गवळी यांनी दिशाभूल केली. खासदारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा यांनी केला आहे. शरद पवार यांची भावना गवळी यांनी भेट घेतल्यानंतर सारडा यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले, ‘माझ्यावर यापूर्वीही दोन वेळा हल्ले झाले. धमकी देण्यात येत आहे. पोलिसांनी सुरुवातीला संरक्षण दिले आणि नंतर काढून घेतले. पोलिस उपअधीक्षकांनी मोबाइल जप्त केला. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. गवळी यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील शंभर कोटी रुपयांचा श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना २५ लाख रुपयात खरेदी केला. त्यांचे खासगी सचिवांच्या भावना अॅग्रो प्रॉडक्ट अॅण्ड सर्व्हिसेसच्या नावावर हा व्यवहार झाला. हा घोटाळा उघडकीस आणल्यापासून धमक्यांचे फोन येत आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही अद्याप कारवाई झाली नाही. पोलिसांची खासदारांना साथ लाभली आहे. त्यांच्याकडून जीवाला धोका आहे,’ असा गंभीर आरोप सारडा यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुस्लिमानांनी मतं न दिल्याचा आरोप करताय, मुस्लिम काय कैदी आहेत का?; ओवैसींचा तिखट सवाल
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत ?’
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
