Share

योगींच्या राज्यात महिला असुरक्षित ?, विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून रस्त्यावर फेकले

Published On: 

आग्रा : उत्तर प्रदेशमध्ये दररोज शेकडो हत्या, लूटमार, अपहरण आणि बलात्काराच्या घटना, हेच भाजपच्या नेतृत्वाताली योगी आदित्यनाथ सरकारच्या मुख्य उपलब्धी आहेत असं म्हंटल तर अतिशोक्ती ठरणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुशासनाचे दावे करतात. एकीकडे योगी आदित्यनाथ गुन्हे आणि गुन्हेगारांवर वचक बसविण्याच्या बड्या-बड्या बाता करतात, मात्र उत्तर प्रदेशमध्ये गुंडगिरीने मोठा कळस गाठला आहे.

आता आग्य्रात विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. रविवारी रात्री उशिरा हा लाजिरवाणा प्रकार घडल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार झाले.

बरहन पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन महिलेची वैद्यकीय तपासणी केली. तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे. आग्रा ग्रामीण पोलीस अधीक्षक सत्यजीत गुप्ता या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या आमिषाने कॅटरर आणि एका व्यक्तीने पीडित महिलेला निर्जनस्थळी नेले. तिथे तिघेजण आधीच उपस्थित होते. त्यानंतर पाच जणांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने पोलिसात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पीडित महिला समारंभांमध्ये जेवण बनवण्यासाठी मदतनीस म्हणून काम करते. आग्र्यातील एका लग्न सोहळ्यात पुरी तळण्याच्या कामासाठी पीडित महिला गेली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!