Share

मोठी बातमी! बांग्लादेश दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. या घटनेला १५ दिवसाचा कालावधी झाला आहे.

यानंतर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार बांग्लादेश दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघात कोरोनाने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दौऱ्यावर श्रीलंका क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक चमिंडा वास आणि क्रिकेटपटू इसुरु उडाना व शिरन फर्नांडो यांचा शनिवारी २२ मे रोजी कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला होता. मात्र २३ मे रोजी त्यांची दुसरी चाचणी केली असता यातील दोघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. त्यामुळे आज होणारा पहिला एकदिवसीय सामना ठराविक वेळेनुसार खेळवला जाणार आहे.

तसेच, शनिवारी २२ मे रोजी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक आणि माजी कर्णधार खालिद महमूद यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्यांनी मालिकेतून माघार घेतली आहे. तसेच खालिद हे ढाका प्रीमियर लीगमधील फ्रँचायझीचे प्रशिक्षक आहेत. ही स्पर्धा ३१ मे पासुन सुरु होणार आहे. खालीद हे सध्या घरीच विलगीकरणात आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यातील पुढील सामने २५ मे आणि २८ रोजी खेळवले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!