नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्या गोष्टीची गेल्या दीड वर्षापासून प्रतिक्षा होती ती आज पूर्ण झाली आहे. आज दि. १४ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याला का रोखण्यात आले यावर मंथन झाले. यानंतर मोदी कॅबिनेटने यातील अडथळा दूर करण्यात आला.
मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढवून २८ टक्के इतका केला आहे. त्यामुळे महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे तीन हफ्ते प्रलंबित आहेत. सरकारने कोरोनामुळे महागाई भत्त्याला स्थगिती दिल्याने हे हफ्ते प्रलंबित होते. सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या हातात घसघशीत पगार येणार आहे.
The Dearness Allowance (DA) for Central Government employees and pensioners has been increased from 17% to 28%. This will be applicable from 1st July 2021: Union Minister Anurag Thakur pic.twitter.com/SCy3AS2hoN
— ANI (@ANI) July 14, 2021
पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि पेशनर्सचा महागाई दिलासा (DRS) यांमध्ये अनुक्रमे १७ टक्के आणि २८ टक्के या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका
- ‘उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा’
- आर्यलँडच्या विजयानंतर टीम इंडियाला बसला फटका, मात्र…
- SBI अलर्ट! कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी राहा सावध
- “२०१४ प्रमाणे पुन्हा धोका मिळू नये यासाठीच….,” पटोलेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले


