मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच लोकसंख्या धोरण जाहीर केले होते. यामध्ये राज्याची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय सुचवण्यात आले आहेत. अशा प्रकराचे धोरण जाहीर करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथांच्या या धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल मंगळवारी टीका करणारे ट्विट केले होते.
‘देशात १३ टक्के मुस्लिमांना दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर ८३ टक्के हिंदूंना दोन पेक्षा जास्त मुलं आहेत. लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून अतुलचं म्हातारपण कष्टप्रद करण्याचा डाव आहे’, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला होता. पण यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी आव्हाड यांच्या टीका करत त्यांना ट्रोल केले. काही जणांनी कौटुंबिक पातळीवर जात आव्हाड यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले. त्यामुळे या ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत आव्हाड यांनी आज बुधवारी पुन्हा एकदा ट्विट केले आहे.
आणि मला एकाच मुलगी आहे आणि ती राजकारणापासून कोसो दूर आहे … आणि राहील https://t.co/0rHyBvp5v3
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 14, 2021
आज केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणालेत की, ‘आणि मला एकाच मुलगी आहे आणि ती राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’. सोबतच आव्हाड यांनी काल केलेले ते ट्विट पुन्हा रिट्विट केले आहे. भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केल्याने आव्हाड यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केल्याचे यानिमित्त दिसून आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची घोषणा! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका
- ‘उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा’
- आर्यलँडच्या विजयानंतर टीम इंडियाला बसला फटका, मात्र…
- SBI अलर्ट! कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी राहा सावध


