🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत.
स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर ४३० विद्यार्थी आम्हीपण आत्मदहन करु असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फोन करुन सभागृहात हा विषय मांडण्याची मागणी केली आहे. नोकरीच्या वयोमर्यादेत दोन वर्ष वाढ द्या, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण हलका होऊ शकतो, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये सरकारनं द्यावेत, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली आहे. स्वप्निलने असे करायला नको होते, अशी सगळ्यांचीच भावना आहे. पण, तो नाउमेद झाला असेल, त्याचा भ्रमनिरास झाला असेल.
पण, काल झालेल्या बैठकीत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. या विषयावर सर्वांनीच भूमिका मांडली. सरकारने ही गोष्ट गांभिर्याने घेतलेली आहे. आज सभागृहात सांगू इच्छितो की, सरकार ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या संपूर्ण रिक्त जागा भरेल. यात कोणताही अडथळा येणार नाही’ अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये द्या; सुधीर मुनगंटीवार यांची विधिमंडळात मागणी
- हकालपट्टीनंतर दोन आठवड्यात अझरुद्दीनने केले पुनरागमन
- संजय राऊत यांना विरोधकांना उपदेशाचे डोस पाजण्याचा नैतिक अधिकार आहे का ?
- मिताली राजबद्दलचं मत बदललं, रमेश पोवार म्हणाले…
- ‘झुंड’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या सह-कलाकाराला अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
