मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अवघ्या दोन दिवसांचे अधिवेश होणार असल्याने विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनात विरोधक गोंधळ घालण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात भाष्य करताना खा. संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले आहे. गोंधळ म्हणजे रणनीती नाही. त्यामुळे अधिवेशन गोंधळात वाहून जाऊ देऊ नका, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.
गोंधळ म्हणजे रणनीती नाही. अधिवेशन चालू न देणे याला रणनीती म्हणणार का? अशी रणनीती समोरून देखील होऊ शकते, पण दोन दिवसाचे अधिवेशन गोंधळात वाहू देणार का?, असा सवाल राऊत यांनी केला. राज्यापुढे अनेक प्रश्न आहे. एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावर चर्चा होऊ शकते. कोरोनावर चर्चा होऊ शकते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले. शिवसेनेचे किंवा सरकारचे अनेक मुद्दे असू शकतात. ते राज्याच्या हिताचे असू शकतात. त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. कायदे होणे गरजेचे आहेत. ठराव मंजूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधी पक्षाने विधिमंडळाचे कामकाज पूर्ण वेळ चालू देणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष स्वतःला महाराष्ट्राचे समजत असतील, त्यांना महाराष्ट्राचे हित व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी दोन दिवस पूर्ण वेळ अधिवेशन चालू द्यावे, असं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकास आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा विरोधकांनी निषेध केला आहे. संतापजनक बाब म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार असून, अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आल्या आहेत मग महत्वाच्या मुद्द्यांवर मग राऊत जे उपदेशाचे डोस विरोधकांना पाजू पाहत आहेत ते सरकारला का पाजले जात नाहीत असा सवाल देखील उपस्थित होत आहे. अधिवेशन शांततेत पार पडावे यासाठी फक्त विरोधकांनीच संयम का दाखवावा?
आक्रमकपणे विरोधकांनी मुद्दे मांडले नाहीत तर त्या मुद्द्याचे गांभीर्य सरकारला कळेल एवढे सरकार संवेदनशील आहे का ? संजय राऊत यांना जनतेचे एवढीच काळजी असेल तर मग दोनच दिवसाचे अधिवेशन का ठेवले याचे देखील उत्तर संजय राऊत यांनी द्यायला हवे. जर या प्रश्नांची उत्तरे संजय राऊत हे देऊ शकत नसतील तर त्यांना विरोधकांना उपदेशाचे डोस पाजण्याचा अधिकार आहे का असा देखील सवाल उपस्थित केला जाऊ शकतो.
एकाबाजूला राज्यात चक्रीवादळग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना काळातील भ्रष्टाचार, आशा वर्कर्स, धनगर आरक्षण, प्रलंबित नियुक्त्या, एमपीएससी परीक्षा, कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी, परिचारिकांसह कोरोना योद्ध्यांचे मानधन, कायदा सुव्यवस्था अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा आणि सरकारने उत्तर देणं अपेक्षित असताना कोरोनाचं कारण देत अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधक महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवाराचा पराभव करण्याची भीती सरकारला वाटत आहे का असा देखील सवाल उपस्थित होत असून त्यामुळे सरकार विरोधकांना घाबरले आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकार विरोधकांना घाबरले ?
- लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माहीचं साक्षीला खास गिफ्ट! पाहा फोटो
- दादा कोंडकेंच्या घराचा फोटो शेअर करत प्रथमेश परबने वेधले अनेकांचे लक्ष्य
- हरभजनच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ ; वाढदिवसादिवशी मिळालं खास गिफ्ट
- स्ट्राईक रेटवर टिका करणाऱ्यांना मितालीने खडसावले, म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

