Share

मिताली राजबद्दलचं मत बदललं, रमेश पोवार म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाला अखेर विजयी सुर गवसला आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ४ गडी राखुन विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेल्या २२० धावांचे लक्ष्य ६ गडी गमावत पार केले. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, मितालीच्या या कामगिरीनंतर भारतीय महिला टीमचे हेड कोच रमेश पोवार हे खुश झाले आहेत. कॅप्टन मिताली राज बरोबर झालेल्या मतभेदामुळे पोवार यांनी 2018 साली राजीनामा दिला होता. इंग्लंड दौऱ्यावर पोवार मितालीशी जुळवून घेणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी दोघांनीही जुना वाद विसरुन पुढे जाण्याचे संकेत दिले होते.

मात्र, इंग्लंड विरुद्धची वन-डे मालिका संपल्यानंतर पोवार यांचं मितालीबद्दलचं मत बदलल्याचं दिसत आहे. बीसीसीआय केलेल्या एका व्हिडिओत पोवार यांनी मितालीच्या खेळाबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. “कॅप्टन मिताली राज पूर्णपणे प्रशंसेस पात्र आहे. 22 वर्ष क्रिकेट खेळणे हे अनेक मुलींना प्रेरणा देणारे आहे. तिनं एकटीच्या बळावर आम्हाला मॅच जिंकून दिली. स्लो पिचवर 220 रनचा पाठलाग करणे सोपे नव्हते. मितालीच्या खेळामुळे आम्हाला विजय मिळाला.” पोवारनं यावेळी म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!