Share

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये द्या; सुधीर मुनगंटीवार यांची विधिमंडळात मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातीलराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. पण, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. याच नैराश्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.

या घटनेमुळे अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया समाजातून येत आहे, स्वप्नीलच्या आत्महत्येनं त्यांच कुटुंब दुःखात बुडालं आहे. स्वप्निलच्या मृत्यूचं वृत्त त्याची आई छाया लोणकर यांच्यासाठी मोठा आघात ठरला. तर विरोधकांनी देखील ठाकरे सरकारवर या सर्व प्रकरणामुळे सडकून टीकास्त्र डागले.

राज्य सरकारला आजवर एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. यामुळे स्वप्निल लोणकरने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही म्हणून आत्महत्या केली. यासाठी राज्य सरकारने स्वप्निलच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या, अशी मागणी विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दरम्यान, स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून काल मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यातील विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता एमपीएससी परीक्षे संदर्भात राज्य सरकार समिती गठीत करणार आहे. ही समिती एमपीएससी परीक्षेसंदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. आता राज्य सरकार यावर पावले उचलत आहेत. त्यामुळे स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर आता कुठे सरकारला जाग आल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!