मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अनेकांचे आवडते हिरो आहेत. १९ व्या शतकापासून त्यांनी मनोरंजन सृष्टीत स्वतःची एक मोठी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चाहता वर्ग देखील मोठा आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाची अनेकदा चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा या चित्रपटाची एका वेगळ्या कारणांमुळे चर्चा होत आहे.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘झुंड’ या चित्रपटातील एक अभिनेता प्रियांशु म्हणजेच बाबू रवी क्षेत्री या कलाकाराला पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या २० वर्षांचा हा कलाकार असून त्याला वाईट संगतीमुळे वाईट सवयी लागल्या आणि याचमुळे त्याला व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ११ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
‘झुंड’ या चित्रपटात त्याने उत्तम काम केल्यामुळे चर्चेत आला होता उत्तम भूमिका साकारत तो चर्चेत आला होता. त्याला फुटबॉल खेळण्याची सुद्धा प्रचंड आवड आहे. मात्र हलाखीची परिस्थिती आणि वाईट संगती यामुळे प्रियांशु चुकीच्या मार्गावर गेला होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो आपल्या मित्रांच्या साथीने रेल्वेमध्ये चोरी करत होता. त्याचे वडील मजूरीचं काम करतात. तर त्याला तीन बहिणीसुद्धा आहेत.
अमिताभ यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या अमिताभ हे ‘गूड बाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘बह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या


