मुंबई : नियमभंग केल्याच्या आरोपावरुन भारताचा माजी कर्णधार खेळाडू मोहम्मद अझरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसीएशनच्या अध्यक्षपदावरुन निलंबीत करण्यात आले होते. तसेच अझरुद्दीनचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. यासह असोसीएशनने अझरला नोटीसही बजावली होती. मात्र केवळ दोन आठवड्याच्या कालावधीत त्याने पुनरागमन केले आहे.
मोहम्मद अझरुद्दीनवर बीसीसीआयने मान्यता न दिलेल्या स्पर्धेत खेळणाऱ्या दुबईतील एका क्रिकेट क्लबचा सदस्य आहे असा आरोप ठेवण्यात आला होता. यासंदर्भातील माहिती अझरुद्दीनने असोसीएशनपासुन लपवली आसल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. या प्रकरणात हैदराबाद क्रिकेट असोसीएशनच्या पाच वरिष्ट सदस्यांनी त्याचे निलंबन केले होते. याप्रकरणी अझरला कारणे दाखवा अशी नोटीसही बजावली होती.
हैदराबाद क्रिकेट असोसीएशनची पाच सदस्यीय समीतीला लोकपाल दिपक वर्माने अपात्र ठरवत अझरुद्दीनच्या हकालपट्टीचे आदेश रद्द केले आहे. या पाच सदस्यीय समितीत जॉन मनोज, आर. विजयानंद, नरेश शर्मा, सुरेंद्र अग्रवाल आणि अनुराधा यांचा समावेश होता. लोकपाल शर्मा यांच्या म्हणण्यानुसार अझहरच्या विरोधीतील तक्रार लोकपालकडे न पाठवता त्यांनी परस्पर निर्णय घेतला होता. तो आधिकार त्यांना नाही असे म्हणत अझहरचे निलंबन रद्द करत भविष्यात त्याच्यावर कोणतीही कारवाईपासुन दुर राहण्याचे अदेश सदस्यांना दिले.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊत यांना विरोधकांना उपदेशाचे डोस पाजण्याचा नैतिक अधिकार आहे का ?
- पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकार विरोधकांना घाबरले ?
- लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माहीचं साक्षीला खास गिफ्ट! पाहा फोटो
- दादा कोंडकेंच्या घराचा फोटो शेअर करत प्रथमेश परबने वेधले अनेकांचे लक्ष्य
- हरभजनच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ ; वाढदिवसादिवशी मिळालं खास गिफ्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

