रायपूर : रायपूर येथे शनिवार, 13 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका लेजेंड्स संघाविरुद्ध इंडिया लेजेंड्सने मोठा विजय मिळविला. सचिन तेंडुलकरचे अर्धशतक आणि युवराज सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर इंडिया लेजेंड्सने 56 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह इंडिया लिजेंड्सने स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
सामन्यादरम्यान जागतिक क्रिकेटमधील षटकारांचा बादशहा युवराज सिंगने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवलाय. शनिवारी पार पडलेल्या वर्ल्ड सेफ्टी सिरीजच्या इंडिया लिजेंड्स विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजेंड्सयांच्यातील सामन्यात युवराज सिंगने एकाच ओव्हरमध्ये गगनचुंबी 4 षटकार लगावले. 18 व्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारत त्याने त्याच्याच 6 षटकारांची आठवण पुन्हा क्रिकेट रसिकांना करुन दिली.
युवराज सिंगने 22 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्याने या खेळीला 6 षटकार आणि 2 चौकारांचा साज चढवला. नाबाद 52 धावा करताना ‘टायगर अभी जिंदा हैं…’ हेच त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं.
https://twitter.com/Vinay_Kumar_R/status/1370809622651498497?s=20
युवराजच्या या उत्तम कामगिरीनंतर सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. यातच क्रिकेटपटू विनय कुमारने देखील ट्विट करून अभिमानदंन केलं आहे. विनय कुमारचे हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. विनय कुमारने ट्विटरवर युवराज आणि त्याचा फोटो शेअर करून लिहिले, ‘युवी पाजी यांनी आम्हाला 2007 च्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये जवळजवळ परत आणले. जेव्हा तो जात असेल तेव्हा स्टेडियममध्ये हे संपूर्ण वेडेपणा आहे. मोठा माणूस आणि त्याच्या षटकारांचे प्रेम प्रकरण.’ विनयच्या या ट्विट नंतर नेटकऱ्यांनी देखील या ट्विटला कंमेंट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

