Share

”सत्यमेव जयते’ मधून मोठमोठ्या गोष्टी सांगतो आणि स्वतःवर वेळ तेव्हा…’ ; लडाखमधील गावकऱ्यांची आमिरवर टीका

Published On: 

लडाख : या दोघांनी घटस्फोटाची  घोषणा केल्यानंतर २४ तासाच्या आत आमिर खान आणि किरण राव हे दोघे पुन्हा एकत्र पाहायला मिळाले होते. हे दोघेजण लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या शूटिंगसाठी एकत्र आले होते. लाल सिंह चड्ढा या चित्रीकरसाठी दोघेजण लडाखमधील वाखा गावात होते.

त्यानंतर मात्र गावकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली झाले असे की, चित्रीकरणादरम्यान अमीरच्या टीमने तिथे खूप कचरा पसरवला असल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. आणि त्याचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. या व्हिडओमध्ये वाखा गावात खूप कचरा झालेला दिसत आहे. अशी घटना पहिल्यांदा घडली नसून यायाधी देखील बॉलीवूडमधील कलाकार चित्रीकरणासाठी जिथे जातात तिथे असाच कचरा करतात त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील शेअर केले जातात.

हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘ बॉलिवूड स्टार अभिनेता आमिर खान त्याच्या आगामी लाल सिंह चड्ढा सिनेमाची टीम लडाखमधील वाखा गावाला ही भेट देऊन निघून गेले आहेत. आमिर खान स्वतः त्याच्या गाजलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातून पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात. परंतु जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा काय करतात ते बघा…’ असं म्हणत गांवकऱ्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली आहे.

दरम्यान अमीर घटस्फोटानंतर सर्वच स्तरातून अमीरवर टीका होताना दिसत आहे. या घटस्फोटाआधी अमीरने आपल्या पहिल्या बायकोला १६ वर्षात घटस्फोटा दिला होता. त्यामुळे आमिरवर जोरदार टीका होताना दिसत आहेत.

महत्त्वाच्याा बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!