Share

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

पण त्यापूर्वी टीम इंडियासाठी चिंताजनक बाब आहे. ती म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या सरळ हाताच्या बोटाला टाके घालण्यात आले आहे. तथापि इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तो पूर्णपणे फिट होण्याची अपेक्षा केली जात आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात किवी संघाच्या दुसर्‍या डावादरम्यान स्वत:च्या बॉलवर ड्राइव्ह रोखताना तो जखमी झाला होता. मालिकेपूर्वी तो फिट होण्याची अपेक्षा केली जात आहे. मात्र अजूनही याबाबत कोणतही स्पष्टीकरण मिळालेलं नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!