Share

Sharad Pawar : “देवेंद्र फडणवीसांचा चेहराच सांगत होता ते नाराज आहेत”; शपथविधीनंतर शरद पवारांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले कि, जे आसाममध्ये गेले होते, त्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा जास्त होती असे वाटत नाही. मात्र दिल्ली किंवा नागपूरवरून आदेश आला. यानंतर या आदेशामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यानंतर पुढे शिंदेंना मुख्यमंत्री पद भेटणार याची कल्पना त्यांनाही नसावी, असं देखील ते म्हणाले.

दुसरं आश्चर्य हे की, आदेश दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावा लागतो. याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली हा आश्चर्याचा धक्का होता. मात्र देवेंद्र फडणवीसांचा चेहराच सांगत होता ‘ते’ नाराज आहेत, असं म्हणत शरद पवारांनी टोला लगावला. तसेच बंडखोर आमदार राज्यात असते तर काहीतरी करु शकलो असतो, असे वक्तव्य शरद पवार यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!