Share

कसोटी मालिकेआधी भारताला मोठा धक्का; ‘हा’ महत्वाचा खेळाडू पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार

Published On: 

ऑस्ट्रेलिया : सद्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने २-१ ने वन-डे मालिका गमावली असून टी-२० मालिका मात्र २-० ने आपल्या खिशात घातली आहे. या दौऱ्यावर संघ निवडीमुळे टीका करण्यात आल्या होत्या. तर, दुखापतग्रस्त रोहित शर्मा व इशांत शर्मा यांच्या पुनर्गमनावरून देखील अनेक अंदाज वर्तवले गेले होते.

आता, टीम इंडियाच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. रोहित शर्मा , इशांत शर्मा हे दुखापतीतून सावरण्यासाठी BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) तंदुरुस्तीसाठी दाखल झाले आहेत. इशांतनं मालिकेतून माघार घेतली आहे, तर रोहितच्या सहभागाविषयी अजूनही अनिश्चितता आहे. त्यात पहिल्या कसोटीतून आणखी एक खेळाडू खेळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

पहिल्या टी०२० सामन्यामध्ये फलंदाजी करताना अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा जखमी झाला होता. या सामन्यात concussion नियमानुसार त्याच्याजागी युजवेंद्र चहलला संधी मिळाली आणि त्यानं भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण, ३२ वर्षीय जडेजा पहिल्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुखापतीमुळे जडेजाला तीन आठवड्यांच्या सक्तिच्या विश्रांतीवर जावं लागणार आहे आणि त्यामुळे तो १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीत खेळणार नाही. बीसीसीआयनं अजून अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.त्याची दुखापत तरीही बरी न झाल्यास २६ डिसेंबरपासूनच्या दुसऱ्या कसोटीलाही त्याला मुकावे लागू शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!