Share

T20 World Cup | lPL संदर्भात प्रश्न विचारतात बाबर आझम झाला अस्वस्थ

Published On: 

🕒 1 min read

मेलबर्न: आज टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमधला अंतिम (Final) सामना पाकिस्तान (Pakisthan) आणि इंग्लंड (England) या संघांमध्ये खेळाला जात आहे. या सामन्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहे. तर दुसरीकडे दुसऱ्यांदा विश्वविजेता  बनण्यासाठी या दोन्ही संघाने कंबर कसली आहे. मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर हा सामना रंगला आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना धांदल झाल्याची पाहायला मिळाला आहे.

आज होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम पाकिस्तान पत्रकार परिषदेमध्ये अंतिम सामान्याच्या तयारीविषयी प्रश्न विचारेल असे अपेक्षित करत होती. पण अचानक आयपीएलचा मुद्दा निघाल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम अस्वस्थ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, पाकिस्तानी उत्तर देत वेळ मारून गेली. ” आपला खेळ सुधारावा म्हणून पाकिस्तानी क्रिकेटर भविष्यामध्ये आयपीएलमध्ये खेळतील का?” असा प्रश्न पत्रकार परिषदेत बाबर अझमला विचारण्यात आला होता. हा प्रश्न विचारतात चकित झालेल्या बाबरने शेजारी उभा असलेल्या मॅनेजर कडे पाहिले. “आपण केवळ विश्वचषकासंबंधित प्रश्न घेत आहोत”, असे उत्तर त्यावेळी मॅनेजरने दिले.

2009 पासून पाकिस्तान संघाने आयपीएल सामना खेळलेला नाही. दोन्ही देशातील राजकीय तणावामुळे पाकिस्तानी संघ आयपीएल स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. तर केवळ आयपीएलच्या उद्घाटन सामन्यांमध्ये पाकिस्तान संघ खेळायला होता.

एकीकडे विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू असताना दुसरीकडे, आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनचे नियोजन सुरू केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!